फेसबुक लवकरच लाँच करणार टिव्ही स्ट्रिमिंग डिव्हाईस


अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपुर्वीच अ‍ॅपल टिव्ही + ही स्ट्रीमिंग सर्विस सुरू करण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅपलची ही सर्विस 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आता नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल यांना टक्कर देण्यासाठी सर्वात मोठी सोशल मीडिया फेसबूक देखील ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्विस सुरू करणार आहे. फेसबूक स्ट्रिमिंग डिव्हाईस लाँच करणार असून, हे डिव्हाईस अ‍ॅमेझॉन फायर स्टिक आणि एअरटेल एक्सस्ट्रिम डिव्हाईस प्रमाणे कार्य करेल. या स्ट्रिमिंग डिव्हाईसद्वारे तुम्ही ऑनलाइन व्हिडीओ कंटेट तुमच्या टिव्हीवर एक्सेस करू शकता.

फेसबुकच्या या डिव्हाईसमध्ये कॅमेरा, व्हिडीओ चॅटिंग, टिव्ही व्यूइंग आणि ऑग्मेंटेड रियालिटी सारखे फिचर्स असतील. या स्ट्रिमिंग डिव्हाईसद्वारे नेटफ्लिक्स, डिझनी, एचबीओ सारखे इंटरनॅशनल ऑनलाइन कंटेट एक्सेस करता येणार आहेत.

या डिव्हाईसचा वापर करून युजर्स फेसबुक अकाउंटच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग आणि चॅटिंग देखील करू शकणार आहेत. फेसबुक हा डिव्हाईस यावर्षाच्या अखेरपर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. याचबरोबर फेसबुक व्हिडीओ चॅट डिव्हाईस पोर्टलसाठी नवीन वर्जन देखील लाँच करेल.

फेसबुकने पोर्टल डिव्हाईस मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केले होते. त्याची किंमत जवळपास 14 हजार रूपये आहे. यामध्ये 10 इंचचा डिस्प्ले देण्यात आला होता.

Leave a Comment