तीन वर्षांपासून गायब आहेत पुणे पोलिसांच्या एसयुव्ही!

वेश्यागृह, मसाज पार्लर आणि स्पा याठिकाणाहून मुली व महिलांना वाचवून त्यांना नेण्यासाठी केंद्राकडून पुणे पोलिसांना स्पेश एसयुव्ही देण्यात आल्या होत्या. मात्र मागील तीन वर्षांपासून गायब झाल्या आहेत.

महिलांची सुटका करून, त्यांची ओळख लपवण्यासाठी खास रंगाच्या काच असणाऱ्या एसयुव्ही पोलिसांना देण्यात आल्या होत्या. मात्र या एसयुव्ही कार मागील तीन वर्षांपासून कोठे आहेत, याचा कोणताच ठावठिकाणा पुणे सिटी पोलिसांना नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 8 वर्षांपुर्वी या गाड्या देण्यात आल्या होत्या. मात्र मानवी-तस्करी विरोधी कक्ष आणि मोटार ट्रांसपोर्ट विभागाला देखील याबाबत काहीही माहिती नाही.

पोलिस कमिशनर के. वेकंटेशम् म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल व  मानवी-तस्करी विरोधी कक्ष या दोन्ही गाड्या शोधून काढेल.

केंद्राकडून देशभरात मानवी-तस्करी विरोधी कक्षांना या खास गाड्या प्रदान करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की, एक गाडी पुणे शहर आणि पिपंरी चिचंवड भागासाठी वापरण्यात येत असण्याची शक्यता आहे. तर दुसरी गाडी पुणे ग्रामीण आणि सातारा, अहमदनगर आणि सोलापूर या भागात वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यात मानवी-तस्करी विरोधी कक्षांने बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंढवा या भागांमधील मसाज पार्लर आणि स्पामध्ये छापे टाकले आहेत. या छाप्यात पश्चिम बंगाल, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश याचबरोबर थायलंड आणि उझबेकिस्तानच्या महिलांची सुटका केली आहे.

Leave a Comment