मोटोरोलाने आणला नवीन टिव्ही आणि स्मार्टफोन


स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने भारतात स्मार्ट टिव्ही आणि मोटो ई सीरिजमधील मोटो ई6एस हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

टिव्हीविषयी सांगायचे तर कंपनी भारतीय बाजारात सहा वेगवेगळ्या आकारांच्या टिव्हीची विक्री करणार आहे. या टिव्हींची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेझ् सेलमध्ये होणार आहे.

(Source)

मोटोरोला स्मार्ट टिव्हीमध्ये autuneX डिस्प्ले टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 2.25 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे. ग्राफिक्स प्रोसेसिंगसाठी यामध्ये Mali 450 GPU देण्यात आला आहे. हे सर्व टिव्ही अँड्राइड 9 पाय प्रोसेसरवर कार्य करतील. टिव्हीबरोबर वायरलेस गेमपॅड देखील देण्यात येईल.

किंमतीविषयी सांगायचे तर 21 इंच HDR टिव्हीची किंमत  13,999 रुपये,  43 इंच Full HD टिव्ही 24,999 रुपये, 43 इंच Ultra HD (UHD) ची किंमत 29,999 रुपये, 50 इंच UHD टिव्हीची किंमत 33,999 रुपये, 55 इंच UHD ची किंमत 39,999 रुपये आणि 65 इंच UHD टिव्हीची 64,999 रुपये आहे.

(Source)

32 इंच ते 65 इंच टिव्हीमध्ये 4K पॅनेल देण्यात आला आहे. ऑडियोसाठी यात Dolby Vision असून, याचबरोबर 30W चा फ्रंट फेसिंग स्पीकर देखील देण्यात आलेला आहे. कंपनीने अँड्राइड गेम कंट्रोलरला कनेक्ट करण्यासाठी यात blazeX टेकचा वापर केला आहे.

(Source)

स्मार्टफोनविषयी सांगायचे तर कंपनीने मोटो ई6एस हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. मोटोच्या ई-सिरीजमधील हा पहिलाच फोन आहे, ज्यात दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनची बॅटरी बाहेर काढता येते. यामध्ये 6.1 इंच डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच आहे.

हा फोन केवळ 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या एका व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ई6एस अँड्राइड पायवर चालेल.

(Source)

यामध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले असून, यातील 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत केवळ 7,999 रूपये असून, 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल.

 

Leave a Comment