युसुफजाई मलालावर हिना सिद्धूने साधला नेम


नवी दिल्ली – काश्मीरबद्दल नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाईने ट्विट केल्यानंतर भारताची स्टार नेमबाज हिना सिद्धू भडकली आणि तिने तिच्या ट्विटला चोख प्रत्युत्तर दिले. वास्तविक मलाला युसूफजाई हिने असे ट्विट केले होते की ती काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये आली होती आणि तेथील लोकांबरोबर काहीवेळ देखील घालवला होता. मलाला यूसुफजाई हिने काश्मिरी मुलींच्या शिक्षणाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून वक्तव्य केले होते. तिला उत्तर देताना हिना म्हणाली की तुम्ही सांगितले होते की काश्मीर पाकिस्तानला देण्यात यावा, कारण तुमच्याप्रमाणेच तेथील मुलींच्या शिक्षणात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पाकिस्तानमधील शिक्षणामुळे तिचा जीव जाता-जाता कसा वाचला, याची आठवण हिना सिद्धूने मलाला युसूफजाईला करून दिली. भारताच्या या स्टार नेमबाजने सांगितले की तुला तुझा देश सोडवा लागला आणि तुला तिथे कधीही परत येता आले नाही. ती म्हणाले की, आधी तिने पाकिस्तानात जाऊन एक उदाहरण उभे केले पाहिजे.


मलाला यूसुफजाई हिने असे ट्विट करून म्हटले होते की काश्मिरात मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्या निराश आहेत. आपल्या ट्विटमध्ये तिने दावा केला आहे की काश्मीरमधील तीन मुलींशी याबाबत आपण बोललो असून त्यातील एकीने सांगितले की या परिस्थितीत आपल्याला शाळेत जाता येणार नाही आणि म्हणूनच तिला 12 ऑगस्टला परीक्षादेखील देता आली नाही. तिच्या या ट्विटनंतर नेमबाज हिना सिद्धूने मलालाला शाळेत जाताना पाकिस्तानमधील तालिबान्यांनी तिच्या डोक्यात कशी गोळी घातल्याची आठवण करून दिली. पाकिस्तानमध्ये उपचार सुरू असताना तिची प्रकृती गंभीर झाली, त्यानंतर तिला ब्रिटनमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. जिथे तिचे प्राणाचे रक्षण झाले. त्यानंतर मलाला तिथेच स्थायिक झाली.

Leave a Comment