मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त ‘नमो अ‍ॅप’चे नवीन व्हर्जन लाँच


पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला 69 वा जन्मदिवस साजरा करणार आहेत. जन्मदिवसानिमित्त नमो अ‍ॅप एका नवीन अवतारात लाँच करण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर या अ‍ॅपला मिळालेले हे पहिले अपडेट आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या अ‍ॅपने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. लाखो कार्यकर्ते या अ‍ॅपच्या मदतीने नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले गेले होते.

हे नवीन अपडेट आणखी आकर्षक असणार आहे. याचबरोबर नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक जण हे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. अपडेटमुळे या वापरण्यास अधिक सोपे होणार आहे.

या अ‍ॅपच्या अपडेटबद्दलची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली.

या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला फास्टर आणि वन टच नेविगेशन, नवीन कॉन्टेंट सेक्शन आणि तुमच्या आवडीप्रमाणे कॉन्टेंट दिसेल. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे अ‍ॅप आतापर्यंत 1.5 करोड पेक्षा अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.

नमो अ‍ॅप जगातील कोणत्याही राजकीय नेत्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तुम्ही नरेंद्र मोदींविषयी आणि सरकारच्या कामाविषयी सर्व माहिती मिळवू शकता.

 

Loading RSS Feed

Leave a Comment