‘चलान कापले तर फाशी घेईन’, मुलीची पोलिसांना धमकी

वाहतुकीच्या नियमांमध्ये 1 सप्टेंबरपासून बदल झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांमध्ये भिती दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीने चलान कापले म्हणून गाडी पेटवून दिली होती. तर आता दिल्लीच्या काश्मीरी गेट आयएसबीटीच्या जवळ ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस कर्मचाऱ्याने थांबवल्यावर युवतीने थेट फाशी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली.

दिल्ली ट्रॅफिक पोलिसच्या सेंट्रल रेंज पोलिस अधिकाऱ्यांनुसार, काश्मीरी गेटजवळ स्कूटी चालवणाऱ्या एका युवतीला नियमांचे उल्लंघन केले म्हणून थांबवण्यात आले. स्कूटीची नंबर प्लेट तुटलेली होती. त्यामुळे त्यावरील एक अंक दिसत नव्हता. तसेच तिच्या हेल्मेटला बेल्ट देखील नव्हता व ती स्कूटी चालवताना फोनवर बोलत होती.

(Source)

ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यावर मुलीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. युवती स्कूटी घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी गाडीची चावी काढून घेतली. यावेळी मुलीने पोलिसांशी वाद घालताना हेल्मेट देखील जमीनीवर फेकले.

नंबर प्लेट एकदिवस आधीच कोणीतरी तोडल्याचे युवती सांगते व हेडफोन लावून गाणी ऐकत होते, असे देखील ती पोलिसांना सांगते. त्यानंतर ती पोलिसांसमोर रडू लागते.

(Source)

यावेळी ती युवती अनेकवेळा तिच्या आईला देखील फोन लावते. त्यानंतर पोलिस कर्मचारी युवतीला समज देऊन सोडून देतात. या तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment