दर दोन तासांनी सर्वकाही विसरते ही मुलगी, डॉक्टरही पडले बुचकुळ्यात


जगभरात लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असताता, ज्यांच्यावर उपचार नाहीत. अशाच प्रकारचा विचित्र आजार अमेरिकेतील रिले हॉर्नर हिला देखील झाला आहे. 16 वर्षीय रिले हॉर्नरच्या डोक्याला डान्स करताना  दुखापत झाली. या घटनेनंतर तिला कोणतीही गोष्ट दोन तासांपेक्षा अधिक वेळ लक्षात राहत नाही. प्रत्येक दोन तासांनी तिच्याबरोबर घडणारी घटना ती विसरून जाते.

दुखापत झाल्यानंतर तिला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आले. अनेक टेस्ट आणि स्कॅन करण्यात आले, मात्र डॉक्टरांना देखील तिचा आजार लक्षात येत नाही. डॉक्टर म्हणतात की, तिला आजार काय आहे, हेच माहित नाही तर त्याच्यावर उपचार तरी कसा करणार ?

(Source)

रिले सांगते की, लोकांना माझी गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटते. तिने सांगितले की, तिच्या रूमच्या दरवाजावर कँलेडर लावण्यात आलेले आहे. सप्टेंबर महिना बघून ती खूष होते. मात्र तिला डान्स करताना झालेल्या दुखापतीनंतरचे काहीही आठवत नाही.

(Source)

ती सांगते की, मी आठवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र काहीच लक्षात राहत नाही. डॉक्टरांनी सांगितले होते की, वेळेनुसार यामध्ये सुधारणा होईल, मात्र असे काहीच झाले नाही. रिलेला प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवावी लागते. तिची आई तिला सर्व आठवण करून देण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला काहीच आठवत नाही.

(Source)

रिलेची आई सांगते की, तिला मेडिकल फिल्डमध्ये जायचे होते. मात्र तिचा आजार असाच राहिला तर तिला कुठेच नोकरी मिळणार नाही. रिले प्रमाणेच अशीच एक घटना अमेरिकेच्या ग्रीन्सबोरो येथील कॅटलिन लिटन बरोबर घडली होती. तिला देखील केवळ 12 तासच कोणतीही गोष्ट लक्षात राहत असे.