उबर अ‍ॅपमधील त्रुटी शोधणाऱ्या भारतीयाला मिळाले 4.6 लाखांचे बक्षीस 


भारतीय सायबर सिक्युरीटी रिसर्च आनंद प्रकाशने पुन्हा एकदा कॅब सर्विस देणारी कंपनी उबर अ‍ॅपमध्ये मोठा बग शोधला आहे. आनंदने उबेर अ‍ॅपमधील अशी त्रुटी शोधली आहे, ज्याचा हॅकर्स फायदा उचलू शकले असते.

या बगचा वापर करून हॅकर्स तुमचे उबर अकाउंट एक्सेस करू शकत होते आणि तुमच्या उबर वॉलेटमध्ये पैसे असतील तर याचा देखील हॅकर्स वापर करू शकले असते. या बगमुळे युजरचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकत होते.

आनंद प्रकाशने शोधलेला बग हा उबरच्या टोकनमध्ये होता. जेव्हा तुम्ही उबर अ‍ॅपद्वारे बुकिंग करता, तेव्हा कंपनी एक टोकन तयार करते. या टोकनमध्ये तुमच्या राइडची पुर्ण हिस्ट्री असते. या टोकनद्वारे तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील हॅकर्सला मिळू शकतो.

उबरने म्हटले आहे की, आतापर्यंत हॅकर्सने बगचा चुकीचा वापर केलेला नाही. तसेच, उबरने या बगची माहिती देण्यासाठी बक्षीस म्हणून आनंद प्रकाशला 4 लाख 60 हजार रूपये दिले आहेत.

उबरमध्ये बग शोधण्याची आनंद प्रकाशची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याने उबरमध्ये बग शोधला असून, ज्याद्वारे तो लाइफटाइम उबर कॅबची फ्री राइड घेऊ शकतो.

आनंदने ट्विटर आणि गुगलच्या सिक्युरिटीमध्ये देखील त्रुटी शोधलेल्या आहेत. यासाठी त्याला 1.2 करोड रूपये मिळाले आहेत. त्याने 2015 मध्ये झोमॅटोच्या 62.5 युजर्सला हॅक केले होते. आनंदने Dropbox, ebay, Paypal, SoundCloud, PikaPay, Google, Redhat सारख्या कंपन्यांचे देखील बग शोधले आहेत. आनंद प्रकाश हा सिक्यूर अ‍ॅपचा संस्थापक आहे.

Leave a Comment