या कारची चोरी विमा कंपन्यांसाठी ठरत आहे डोकेदुखी

मागील काही दिवसांपासून ऑटो सेक्टरमध्ये मंदी सुरू आहे. केवळ एसयुव्ही सेगमेंटच असे आहे की, जेथे काही प्रमाणात स्थिरता आहे. मात्र इंश्योरेंस कंपन्यांसाठी एसयुव्ही डोकेदुखी ठरत आहे. याचे कारण आहे, मागील काही दिवसांपासून एसयुव्ही गाड्यांच्या चोरीमध्ये झालेली वाढ.

चोरीमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ –

चोरांच्या निशाण्यावर ह्युंडई क्रेटा, मारूती सुझुकी विटारा ब्रेजा, महिंद्रा स्कॉर्पियो, टोयोटा फॉर्च्युनर सारख्या एसयुव्ही आहेत.  विमा कंपन्यांनुसार मागील आर्थिक वर्षात या गाड्यांच्या चोरीमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, यामुळे त्यांना जास्त क्लेम द्यावा लागत आहे. मागील वर्षी 10 हजारांपेक्षा अधिक एसयुव्ही चोरीला गेल्या आहेत.

चोरीच्या गाड्यांचा क्लेम 1,000 करोड रूपये –

कंपन्यांनुसार, भारतामध्ये विमा असलेल्या 100 मधील केवळ 35-40 गाड्यांचाच क्लेम केला जातो. सर्वसाधारणपणे 2 टक्क्यांपेक्षा कमी विमा असलेल्याच गाड्या चोरीला जातात. दरवर्षी 35 हजार करोड रूपयांचा क्लेम केला जातो. त्यातील 1 हजार करोड रूपये क्लेम हा केवळ चोरी करण्यात आलेल्या गाड्यांचाच असतो.

(Source)

एमजी हेक्टर आणि किओ सेल्टोस –

ब्रेजा आणि क्रेटा या गाड्या सर्वाधिक चोरीला जातात. ऑटो सेक्टरमधील बेस्ट सेलिंग एसयुव्ही ह्युंडई वेन्यू, ब्रेजा, क्रेटा आणि महिंद्रा बोलेरो आहेत. तसचे, काही दिवसांपुर्वीच लाँच झालेल्या एमजी हेक्टर आणि किआ सेल्टोस या देखील चोरांच्या निशाण्यावर आहेत.

(Source)

ऑटोमेटिक व्हेरिएंट्स आणि किलेस एंट्री असणाऱ्या कार –

विमा कंपन्यांनुसार, किलेस एंट्री (इलेक्ट्रॉनिक लॉक) कार चोरांच्या आवडीच्या आहेत. किलेस एंट्री असणाऱ्या एसयुव्हीची 20 टक्के अधिक रिसेल किंमत मिळते. चोरांच्या निशाण्यावर ऑटोमेटिक व्हेरिएंट्स असणाऱ्या कार देखील आहेत.

हँकिंग डिव्हाईसने चोरी –

2017 च्या आधी मोठ्या प्रमाणात पारंपारिक चाव्या असणाऱ्या गाड्याच चोरीला जात असे. मात्र किलेस एंट्री असणाऱ्या गाड्या बाजारात आल्यापासून, हँकिंग डिव्हाईसच्या मदतीने गाड्या चोरी केल्या जात आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक गाड्या चोरीला जातात आणि या गाड्या उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार सारख्या राज्यांमध्ये विकल्या जातात.

कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंट –

चोर ज्या गाड्या लोकप्रिय आहेत, त्यांनाच निशाणा बनवतात. खाकरून कॉम्पॅक्ट एसयुव्ही, या गाड्या खाजगी आणि कमर्शियल अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरता येतात.

(Source)

ह्युंडई वेन्यू सुरक्षित –

काही दिवसांपुर्वीच लाँच झालेली ह्युंडई वेन्यूमध्ये इनबिल्ट ट्रॅकिंग सिस्टमबरोबर नॉटिफिकेशन अलर्ट, इमोबिलाइजर आणि ज्योफेसिंग हे फिचर देखील देण्यात आले आहेत. ह्युंडई वेन्यू आतापर्यंत 18 हजार गाड्या विकल्या गेल्या असून, आतापर्यंत एकही गाडी चोरीला गेल्याची तक्रार आलेली नाही.

डिलरकडून लावून घ्या अँटी-थेफ्ट डिव्हाइसेज –

अनेक डिलर देखील कार खरेदी करताना गाडीत अँटी-थेफ्ट डिव्हाइसेज लावतात. याची किंमत 5 हजार रूपयांपर्यंत आहे. यामुळे गाडी चोरी होण्यापासून वाचते.

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटऱ्या –

दिल्लीमध्ये सर्वाधिक ई-रिक्षाच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. या गाड्यांच्या बॅटऱ्याच सर्वात महाग असतात. मात्र या गाड्यांमध्ये ट्रॅकिंग फिचर लागल्यावर गाड्या चोरी होण्याचे प्रमाण कमी होईल.

Leave a Comment