बलात्काऱ्याला दिली ना भूतो ना भविष्य अशी शिक्षा


कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करणे हे कोणत्याही नागरिकाचे नव्हे तर कायद्याचे काम असते, परंतु अलीकडे अशा बर्‍याच घटना समोर आल्या आहेत, ज्यात जमावाने गुन्हेगारी किंवा संशयाच्या आधारे मारहाण केली आहे. अलीकडेच एक घटना समोर आली आहे, असे देखील कोणी कोण करू शकते हे जाणून आपण आश्चर्यचकित होऊ शकता. जमावाने न्याय देण्याची घटना मॅक्सिको सिटीमध्ये घडला असून, जिथे बलात्कार करणाऱ्या एका तीस वर्षीय संशयित आरोपीला जमावाने अशी शिक्षा दिली जी ऐकूण तुमचा देखील थरकाप उडेल.

गेल्या महिन्यात मेक्सिको सिटीमध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले जाते. संशयित गुन्हेगाराला कायद्याची शिक्षा देण्यापूर्वी जमावाने कायदा हातात घेतला. जमावाच्या न्यायाचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, त्यानुसार एका जमावातील पाच जणांनी प्रथम संशयिताचे कपडे काढून घेतले, नंतर त्याला बेड्या घातल्या आणि नंतर जगातील सर्वात धोकादायक कुत्रा पिटबुल याच्याद्वारे त्याच्या खाजगी भागावर हल्ला केला.

या हल्ल्या दरम्यान, कुत्र्याने त्याच्या खासगी भागाचे इतके नुकसान केले की संशयित गुन्हेगार नपुंसक बनला. तथापि, हल्ल्यादरम्यान आरोपींनी स्पॅनिश भाषेत वेदनादायक ओरडत म्हटले की, हे थांबवा, मला सोडा. ती व्यक्ती स्वत: ला सोडण्याची विनंती करतच राहिली परंतु याचा गर्दीवर परिणाम झाला नाही. हल्लेखोर टोळीच्या सदस्यानेही घटनेचा व्हिडिओ बनविला.

रिपोर्ट्सनुसार इथल्या एका गुन्हेगारी टोळीने बलाकाऱ्यावर कुत्र्याच्या माध्यमातून हल्ला केला आणि लोकांना चेतावणी देण्यासाठी, हा व्हिडिओ सार्वजनिक केला गेला आहे. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात संशयित हल्लेखोर बचावला आहे का हे स्पष्ट झाले नाही. मेक्सिको सिटीमधील स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांपासून अशा घटना घडवून आणणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Leave a Comment