ब्लेनहिम पॅलेसमधून 18 कॅरेट सोन्याचे टॉयलेट गेले चोरीला


लंडन – ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथील ब्लेनहिम पॅलेसमधील सोन्याने बनवलेल्या शौचालयाची चोरी झाली. हे टॉयलेट 18 कॅरेट सोन्याचे बनलेले होते. येथे उभारलेल्या कला प्रदर्शनातून चोरांच्या टोळीने ते चोरले. येथून शौचालय उखडल्यामुळे पॅलेसचा मजला खराब झाला आणि ब्लेनहिम पॅलेस पाण्याने भरुन गेले. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी दोन वाहने वापरली असावीत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे गुरुवारीच प्रेक्षकांसाठी उघडण्यात आले. शनिवारी पहाटे साडेचार वाजता शौचालयाची चोरी झाल्याची माहिती टेम्स व्हॅली पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या निवेदनानुसार चोर घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी एका 66 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ब्लेनहिम पॅलेसमध्ये हे टॉयलेट चर्चिलचा जन्म झाला त्या खोलीच्या जवळ ठेवण्यात आला होता. शौचालय इटालियन कलाकार मॉरीझिओ कॅटलन यांनी तयार केले होते आणि शौचालय त्याच्या प्रदर्शनात ‘विक्टरी इज नॉट एन ऑप्शन’ मध्ये स्थापित केले होते. त्याचे नाव अमेरिका ठेवले गेले.

हे सोन्याचे शौचालय 2016 मध्ये एकदा न्यूयॉर्कमधील गेजेनहेम संग्रहालयात देखील ठेवले होते. हे एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही उधार दिले गेले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment