गुगल मॅप्सच्या मदतीने शोधली तब्बल 22 वर्षांपुर्वी गायब झालेली व्यक्ती


अमेरिकेच्या एका व्यक्तीने गुगल मॅप्सच्या मदतीने तब्बल 22 वर्षांपुर्वी गायब झालेल्या व्यक्तीला शोधले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक व्यक्ती गुगल मॅप्सवर आपल्या आजुबाजूचा परिसर पाहत होता. तेव्हा त्याला घराच्या जवळील तलावामध्ये एक बुडालेली दिसली. त्यानंतर अधिकाऱ्यांना त्याने माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या टीमने तेथे पोहचत कारच्या आतून सापळा बाहेर काढला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो व्यक्ती मागील 22 वर्षांपासून गायब होता.

तलावातून काढण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव विलियम मोल्ड्स असून, तो नोव्हेंबर 1997 पासून गायब होता.ज्या व्यक्तीने कार आणि सापळा शोधण्यास मदत केली त्याने सांगितले की, जेव्हा मी गुगल मॅप्सवर हा फोटो बघितला, तेव्हा घरच्या आधीच्या मालकाला फोन करून याबाबत काही माहिती आहे हे विचारले. त्याने सांगितले की, घर मालकाला देखील याची काहीही माहिती नव्हते. ही गोष्ट ऐकून ते देखील आश्चर्यचकित झाले.

Leave a Comment