हौडी मोदी कार्यक्रमात ट्रम्प सहभागी होणार


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी रविवारी ते २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टन येथे होत असलेल्या हौडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प तेथे भाषण देणार आहेत आणि भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील असे सांगितले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट् महासभेत सहभागी होण्यापूर्वी हौडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच अमेरिकन कंपन्याच्या सीईओ बरोबर राउंड टेबल मिटींग घेणार आहेत.

हौडी मोदी कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत ५० हजार लोकांनी नोंदणी केले आहे. या कार्यक्रमाला अमेरिकन संसदेतील ६० खासदार उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. हौडी मोदी याचा अर्थ हौ डू यु डू असा आहे. मोदी २१ सप्टेंबरला अमेरिकेला रवाना होत असून ते प्रथम ह्युस्टन येथेच जाणार आहेत. त्यानंतर २३ ते २७ संयुक्त राष्ट् महासभेत सहभागी होणार आहेत. या मध्ये मोदी आणि ट्रम्प याच्यात द्विपक्षीय चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत मोठ्या समुदायासमोर भाषण करण्याची पंतप्रधान मोदी यांची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्ये न्युयॉर्क मेडिसन स्क्वायर आणि २०१६ मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे झालेल्या सभांना २० हजाराहून अधिक लोक उपस्थित राहिले होते.

Leave a Comment