मोदी सरकारमध्ये जबाबदारी मिळाल्यास आनंद- देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान चालवीत आहेत. रविवारी सातारा शहराच्या वाटेवर असताना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केंद्रात मोदी सरकारमध्ये जबाबदारी दिल्यास आनंद होईल असे सांगितले. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात फडणवीस यांनी १०० विधानसभा क्षेत्राचा दौरा केला असून ही यात्रा १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे समाप्त होणार आहे.

या यात्रेत फडणवीस यांना पार्टी नेतृत्वाने केंद्र सरकामध्ये जाण्याचा आदेश दिला तर काय करणार असा प्रश्न विचारल्यावर वरील उत्तर दिले. ते म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार हे नक्की आहे. आगामी विधानसभा निवडणुकात एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळेल याची खात्री आहे. राहुल गांधी यांच्यावर लोकांचा विश्वास उरलेला नाही. ते काय बोलतात त्याची गंभीरता त्यांना कळत नाही आणि महाराष्ट्र कॉंग्रेस विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आमचा मुकाबला ते कसा करणार असा प्रश्न आहे.

थोड्याच दिवसात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत आहेत. ५ वर्षाचा कार्यकाल पुन करणारे ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

Leave a Comment