कपिल देव राई क्रीडा विद्यापिठाचे कुलपती नियुक्त


टीम इंडियाचे माजी कप्तान आणि वेगवान गोलंदाज कपिल देव हरियाणाच्या सोनपत येथील राई येथे सुरु करण्यात आलेल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे पहिले कुलपती बनले आहेत. सोनपत येथील राई येथे असलेल्या मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्सच्या कॅम्पसमध्ये या क्रीडा विद्यापीठाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत कोणत्याही विद्यापीठाचे कुलपती पद त्या राज्याच्या राज्यपालांना नियमानुसार दिले जात होते पण हरियाना सरकारने नियम बदलून कपिल देव याची नियुक्ती या जागी केली आहे. कपिल देव याच्याशिवाय अन्य स्टाफच्या नेमणुका लवकरच केल्या जात असल्याचे हरियाणाचे क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात मान्सून सत्रात हरियाणामध्ये हे पहिले क्रीडा विद्यापीठ कार्यरत झाले आहे. कपिल देव हे हरियानाचे असून हरियाणाचे खेळाडू म्हणूनच त्यांनी क्रिकेट कारकीर्द सुरु केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कपिल यांच्यापासून राज्यातील अनेक युवा खेळाडूना प्रेरणा मिळाली असेही अनिल वीज यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

Leave a Comment