गुगलच्या सर्च अल्गोरिद्ममध्ये केवळ ओरिजनल कंटेटच होणार प्रमोट

जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगलने आपल्या सर्च अल्गोरिद्ममध्ये बदल केले आहेत. आता अल्गोरिद्म केवळ ओरिजनल रिपोर्टिंग आणि कंटेटलाच सपोर्ट करणार आहे. जगभरातील मीडियाकडून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर गुगलने हे पाउल उचलले आहे.

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशाच बातम्यांना प्रमोट केले जाईल, ज्यामध्ये इन्वेस्टिगेटिव स्कील्स आणि जर्नलिस्टिक एथिक्सचा योग्य प्रकारे वापर केला जाईल.

जे लेख इन-डेप्थ आणि इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग केलेल असतील अशाच आर्टिकलला गुगल सर्चमध्ये रँक केले जाईल. गुगलने पब्लिशर्स आणि स्टोरिजला रेटिंगसाठी नवीन गाइडलाइन्स देखील जाहीर केली आहे. नवीन गाइडलाइन्सनुसार, जगभरातील 10 हजार पेक्षा अधिक रेटर्स पब्लिशरच्या ऑरिजनल रिपोर्टिंग आणि कामबघून त्याला रेटिंग करतील.

याचबरोबर रिव्यूअर्सच्या फीडबॅकमुळे कोणत्याही रिझल्टच्या रॅकिंगमध्ये बदल होणार नाहीत.

नवीन अल्गोरिद्म कसे काम करेल ?

गुगल न्यूज सर्चच्या अल्गोरिद्मचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. समजा तुम्ही एखाद्या घटनेबद्दल गुगलवर सर्च केले तर अशावेळेस ऑरिजनल रिपोर्टिंग केलेल्याच बातम्या सर्वात आधी दिसतील.  ऑरिजनल रिपोर्टिंग म्हणजे, ज्या स्टोरीमध्ये त्या घटनेबद्दल इन्वेस्टिगेट केले असेल अथवा योग्य रिपोर्टिंग केले असेल.

का बदलले अल्गोरिद्म ?

गुगल सर्चवर जास्त क्लिकेबल हेडलाइन असणारी स्टोरी रॅक करत असे, यामुळे जगभरातील मीडियाकडून गुगलवर टीका करण्यात येत होती. यामुळे इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग आणि सविस्तर रिपोर्टिंग करणाऱ्या मीडिया हाउसला नुकसान होत असे. गुगल न्यूजच्या आधीच्या अल्गोरिद्मबद्दल सांगायचे तर, ते आधी केवळ मोस्ट रिसेंट आणि क्लिक बेट असणाऱ्या न्यूजच सर्चिंगमध्ये रँक करत असे. यामुळे ओरिजनल आणि सविस्तर बातम्या मागे पडत असे.

 

Leave a Comment