OMG…! ही आहेत देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी चलान

1 सप्टेंबरपासून वाहतुक नियमांमध्ये बदल झाल्यापासून नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. यामागे दंडाच्या रक्कमेची भिती हे देखील एक कारण आहे. हेल्मेट खरेदीपासून ते पीयुसी खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावत आहे. अनेक ठिकाणी तर गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक दंड आकारण्यात आलेला आहे. एवढा दंड आकारण्यात आला आहे की, दंडाची रक्कम बघूनच लोक हैराण झाले आहेत. आज अशाच देशातील चलानाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांनी दंडाच्या रक्कमेचे सर्व रेकॉर्डच मोडले आहेत.

(Source)

86,500 रूपयांचे चलान –

ओडिशाच्या संभलपूरमध्ये ट्रक ड्रायव्हर अशोक जादवचे तब्बल 86,500 रूपयांचे चलान कापण्यात आल्याने, अनेक जणांना धक्काच बसला. मात्र नंतर हा दंड 70 हजार रूपये करण्यात आला. कलम 177 अंतर्गत त्यांचे 500 रूपयांचे सामान्य चलान कापण्यात आले. त्याचबरोबर कलम 181 अंतर्गत विना ड्रायव्हिंग लायसेंस गाडी चालवल्याने 5 हजार रूपये, वाहन चालवण्यासाठी अनाधिकृत व्यक्ती म्हणून 5 हजार रूपये, ओव्हरलोड ट्रक म्हणून 56 हजार रूपये आणि ओव्हर डायमेंशनचे 20 हजार रूपयांचे चलान कापण्यात आले.

(Source)

1.41 लाखांचे चलान –

राजस्थान ते दिल्ली जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरचे दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी तब्बल 1.41 लाखांचे चलान कापले. ही रक्कम भगवान राम नावाच्या व्यक्तीकडून भरण्यात आली आहे.

(Source)

2 लाख 500 रूपयांचे चलान –

दिल्लीमध्ये काही दिवसांपुर्वीच आतापर्यंतचे सर्वात मोठे चलान कापण्यात आले. एका ट्रक ड्रायव्हरला ओव्हरलोडिंगसाठी तब्बल 2 लाख 500 रूपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये 56 हजार रूपये ओव्हरलोडिंग, 5 हजार रूपये ड्रायव्हिंग लायसेंस नसल्याने, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी 10 हजार रूपये, 10 हजार रूपये फिटनेससाठी, परमिट वॉयलेशनचे 10 हजार रूपये, इंश्योरेंससाठी 4 हजार रूपये, पीयूसी नसल्याने 10 हजार रूपये, सामना न झाकता नेल्याने 20 हजार रूपये आणि सीट बेल्ट न लावल्याने 1000 रूपये दंड आकारण्यात आला. नियमानुसार जेवढा दंड ट्रक ड्रायव्हरला द्यावा लागेल, तेवढाच ट्रकच्या मालकाला देखील द्यावा लागेल. यानुसार हा दंड एकूण 2 लाख 500 रूपयांचा झाला.

 

Leave a Comment