अरेच्चा ! या कारणामुळे पोलिसांनी दोन बकऱ्यांना केली अटक

पोलिस आरोपींना अटक करते, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तेलगंनामध्ये घडलेला प्रकार वाचून तुम्ही देखील हैराण व्हाल. तेलंगणामध्ये पोलिसांनी एका आरोपाखाली चक्क दोन बकऱ्यांना अटक केली आहे. मात्र नंतर त्या बकऱ्यांना सोडण्यात आले.

या बकऱ्यांवर आरोप होता की, त्यांनी तेलंगणा सरकारचे हरित अभियान हरित हारम च्या अंतर्गत लावलेल्या जंगली बदामाच्या 980 झाडांपैकी 250 झाडे खाल्ली आहेत. या झाडांना ‘सेव्ह द ट्रीज’ नाव देऊन एका एनजीओने करीमनगरच्या हुजूराबाद येथे लावले होते.

एनजीओचे कार्यकर्ता कयासा विक्रांत यांनी अनेकवेळा या प्रकरणात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन बकऱ्यांना पकडले आणि पोलिस स्टेशनमध्ये आणून बांधले. त्यानंतर या बकऱ्यांचा मालक दोरनकोंडा राजावर एक हजार रूपयांचा दंड लावण्यात आला व बकऱ्यांना सोडून देण्यात आले.

याचबरोबर पोलिसांनी राजा यांना बकऱ्यांना शहराच्या बाहेरील भागात चरण्यासाठी घेऊन जाण्याचा सल्ला देखील दिला.

 

Leave a Comment