आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षणाच्या वक्तव्याबद्दल गोयल यांचा माफीनामा


मुंबई – केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या एका कार्यक्रमात आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षण याबद्दलच्या आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पियूष गोयल यांनी माफी मागितली आहे.

आईनस्टाईन बद्दलचे माझे वक्तव्य चुकीचे होते, विज्ञान शाखेतून नंतर कॉमर्सला प्रवेश घेतल्याने माझी जीभ घसरली, असे म्हणत त्यांनी माफी मागितली. पण तरीही चूक करण्यापासून मी घाबरणारा नाही, आईनस्टाईनचेच एक वाक्य आहे, अ पर्सन हू नेव्हर ट्राईज, नेव्हर सक्सीड्स. रिलेटीव्हिटी सोडून चुकून आईनस्टाईनचा संबंध ग्रॅव्हिटीशी जोडला, पण त्याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीबद्दल मला उदाहरण द्यायचे होते, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणचा शोध लावल्याचे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी केले होते. त्यांना यावरून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले. ५ लाख कोटी डॉलरची देशाची अर्थव्यवस्था करताना गणिताचा विचार करू नये, हे सांगताना गोयल यांनी गुरुत्वाकर्षणच्या शोधाचे उदाहरण दिले होते.

Leave a Comment