केंद्र सरकार लवकरच घालणार प्लास्टिकच्या या 12 वस्तूंवर बंदी

केंद्र सरकार लवकरच प्लास्टिकच्या छोट्या बाटल्या, थर्माकॉल आणि सिगरेट्सची पॉकेट्स सारख्या 12 प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची शक्यता आहे. याआधी देखील सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालणार असल्याचे सांगितले होते.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, या वस्तूंवर टप्प्याने बंदी घालण्यात येईल.

सरकारने एक यादी तयार केली असून, ती यादी सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डासमोर बंदी घालण्यासाठी सादर केले जाईल. या यादीत कॅरी बॅग (50 माय्रकोनपेक्षा कमी), छोटी रॅपिंग/पॅकिंग फिल्म, स्ट्रॉस, वाट्या, प्लेट्स, छोटे प्लास्टिकचे कप्स, कंटेनर्स (150एमएल आणि 5 ग्रॅपपेक्षा कमी), फुगे, झेंडे आणि कँडी, पेय पदार्थांसाठीच्या छोट्या बॉटल (200 एमएल पेक्षा कमी) आणि बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी) यांचा समावेश आहे.

2022 पर्यंत देशात सिंगल युज प्लास्टिकचा (एकदाच वापर करता येणारे प्लास्टिक)  वापर पुर्णपणे बंद करण्यासाठी सरकारकडून योजना आखली जात आहे. याचबरोबर प्लास्टिक इंडस्ट्रीला या वस्तूंच्या जागी कोणत्या वस्तू वापरता येतील यासाठी सुचना देण्यास सांगण्यात आले आहे. सिंगल यूज प्लास्टिक बंदीमुळे अनेक जणांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी भारताला सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जाईल.

Leave a Comment