यामुळे आजीबाईंनी 75 व्या वर्षी काढले ड्रायव्हिंग लायसेंस - Majha Paper

यामुळे आजीबाईंनी 75 व्या वर्षी काढले ड्रायव्हिंग लायसेंस

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील हेडलँड येथे राहणाऱ्या विन्नी सॅम्पी यांनी 75 वर्षीय ड्रायव्हिंग लायसेंस काढले आहे. या आजीबाईंनी आपल्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी हे लायसेंस काढले. लायसेंस मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या ब्लडवूड ट्री एसोसिएशनने या आजीबाईंची स्टोरी सोशल मीडियावर पोस्ट केली.

फेसबुक पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, लायसेंस मिळाल्यानंतर आता विन्नी आपल्या मोठ्या बहिणीला दररोज हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी घेऊन जात आहे. याचबरोबर शॉपिंग आणि बीचवर फिरण्यासाठी देखील गाडीने जाते.

विशेष म्हणजे या वयात देखील त्या कोणाकडे लिफ्ट मागत नाहीत की टॅक्सी करत नाहीत. त्यांनी 75 व्या वर्षीपर्यंत कॉम्प्यूटरचा देखील कधीही वापर केला नव्हता. मात्र लायसेंस टेस्ट देखील कॉम्प्यूटरद्वारे दिली.

आपल्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी वयाच्या 75 व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसेंस काढल्याने विन्नी सॅम्पी यांचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे. विन्नी यांनी देखील लायसेंस मिळवण्यास मदत करण्यासाठी एसोसिएशनचे आभार मानले. एसोसिएशनने सांगितले की, लायसेंस मिळवणाऱ्या विन्नी या सर्वाधिक वयाच्या कॅडिडेट होत्या.

 

Leave a Comment