हॉकी गोलकीपरला बक्षीस मिळाली एके ४७


रशियात एका हॉकी गोलकीपरला सामन्यात उत्तम कामगिरी बजावली म्हणून चक्क एके ४७ बक्षीस म्हणून देण्यात आली. इजास्तल इजेस्क संघाकडून खेळणाऱ्या रुवेली कोनोनिव्ह या गोलकीपरने नेचोचेन विरुद्ध ३६ शॉट्स गोल पोस्टमध्ये जाण्यापासून रोखले त्यामुळे नेचोचेनला फक्त दोन गोल करता आले आणि हा सामना इजास्तल इजेस्कने ३ विरुद्ध दोन गोलने जिंकला.

२३ वर्षीय कोनोनोव्हला त्याच्या या कामगिरीबद्दल मॅन ऑफ द मॅच निवडले गेले. सामना संपल्यावर क्लब पदाधिकारी ड्रेसिंग रूम मध्ये गेले आणि तेथे कप्तानाला एके ४७ देण्यात आली पण ती त्याने गोलकीपर कोनोनोव्हकडे सुपूर्द केली. डेली मेलने हे वृत्त दिले आहे.

या बातमीत असेही म्हटले गेले आहे, जगभरात या प्रकारची विशेष बक्षिसे दिण्याची प्रथा प्रचलित आहे. विविध खेळात अशी खास बक्षिसे दिली जातात. नॅशनल हॉकी लीग कॅरोलिना हरीकेन्स टीमच्या खेळाडूना लाकडी कुऱ्हाड बक्षीस देण्याची प्रथा आहे.

Leave a Comment