स्वस्त, मस्त आणि दणकट लाकडी लॅपटॉप


पेरू मधील वावा लॅपटॉप टेक्नोलॉजी कंपनीने नवीन स्वस्त, मस्त आणि दणकट लॅपटॉप बनविला असून या लॅपटॉपसाठी लाकडी भक्कम फ्रेम दिली गेली आहे. विशेष म्हणजे हा लॅपटॉप सहज रिपेअर करता येतो, फ्रेमचा कंटाळा आल्यास ती सहज बदलता येते आणि १५ ते २० वर्षे या लॅपटॉपचा वापर करता येतो. या लॅपटॉपला वावा लॅपटॉप असे नाव दिले गेले आहे.

या लॅपटॉपसाठी लाकडी फ्रेम असली तरी तो वजनाला हलका आहे. पेरूच्या दुर्गम भागात राहणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्यासाठी तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे. २०१५ मध्ये त्याचा प्रोटोटाईप बनविला गेला होता मात्र २०१९ मध्ये त्याचे २.० व्हर्जन सादर केले गेले आहे. लायनेंस ऑपरेटिंग सिस्टीम वर तो चालू शकतो. हा लॅपटॉप नुकताच बाजारात आला असून भारतात तो कधी येईल याची कोणतीही घोषणा केली गेलेली नही. या लॅपटॉपची किंमत १७ हजार रुपये आहे.

या लॅपटॉप संदर्भात माहिती देताना कंपनी प्रमुख म्हणाले, लोकांना नवीन काही देण्यापेक्षा जुनेच अधिक चांगले करून द्यावे या उद्देशाने वावा लॅपटॉप तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जुन्याच एकल बोर्ड संगणकाचा वापर केला गेला असून शालेय विद्यार्थ्यांना तो खुपच उपयुक्त ठरेल. इतकेच नाही तर तो अपग्रेड करूनही घेता येणार आहे. विशेष म्हणजे तो सौरउर्जा आणि वीज असा दोन्हीवर चार्ज करता येईल.

Leave a Comment