देशात प्रथमच खासगी कंपनीने बनविल्या रायफल्स


भारतात प्रथमच एका खासगी कंपनीने स्वदेशी तंत्रज्ञान वापरून स्नायपर रायफल्स बनविल्या आहेत. बंगलोरच्या एसएसएस डिफेन्स या कंपनीने त्या बनविल्या असून सध्या या रायफल्सचे प्रोटोटाईप बनविले गेले आहे. स्पेशल फोर्स कडून या स्निपर्सच्या चाचण्या लवकरच घेतल्या जाणार असून या यशस्वी ठरल्या तर या रायफल्स निर्यातही केल्या जातील असे कंपनी वरिष्ठांनी सांगितले.

कंपनीचे सीइओ विवेक कृष्णन म्हणाले, या रायफल्सचे डिझाईन आणि डेव्हेलपमेंट कंपनीने केली आहे. मोदी सरकारने खासगी कंपन्यांना रक्षा क्षेत्राचा मार्ग खुला करून दिला आहे. त्यामुळे ही कंपनी रायफल्स डिझाईन करू शकली. लष्कराची स्नायपर रायफल्सची दीर्घकाळ मागणी आहे त्यासाठी २० कंपन्यांनी टेंडरही भरली आहेत. मात्र रायफल्ससाठी गोळ्या पुरविण्याबाबत तडजोड न होऊ शकल्याने हे प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.

एसएसएस ने बनविलेल्या स्नायपर्सना वायपर आणि साबेर अशी नावे दिली गेली आहेत. पैकी वायपरची रेंज १ हजार तर साबेरची रेंज १५०० मीटर्स आहे. या रायफल्स चाचणीत यशस्वी ठरल्या तर कंपनीचे आणखी नवे प्लान आहेत. आर्म बिझिनेससाठी या कंपनीने २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment