टेनिसक्वीन सेरेनाचा लेकीसह रँपवॉक


युएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभवास सामोरे जावे लागलेल्या टेनिस क्वीन सेरेना विलियम्स हिने तिच्या फॅशन लेबल ‘ एस बाय सेरेना विलियम्स ‘च्या नवीन कलेक्शन साठी रँपवॉक केला. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत रँपवर तिची दोन वर्षीय लेक ऑलिम्पिया होती. सेरेनाने तिच्या मुलीसह प्रथमच रँपवॉक केला. या फॅशन शो साठी किम कार्दीशिया, टीव्ही होस्ट गेल किंग व वोग मासिकाची संपादक अन्ना विन्तूर उपस्थित होते.

फॅशन शो मध्ये सेरेनाने काळा पारदर्शक टॉप आणि अॅनिमल प्रिंट असलेला स्कर्ट घातला होता. ऑलिम्पिया तिच्या कडेवर होती आणि तिलाही काळा टी शर्ट घातला गेला होता. सेरेना तिच्या कन्येसोबत बराच वेळ घालाविते आणि तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

Leave a Comment