गुजराथमध्ये ५ हजार ठिकाणी होणार मोदींचा वाढदिवस


येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. गुजराथ सरकार आणि भाजपने गुजराथ मध्ये ५ हजार ठिकाणी या वाढदिवसाचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गुजराथ भाजप अध्यक्ष जितूभाई वाघाणी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

१७ सप्टेंबररोजी मुख्यमंत्री विजय रुपानी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल सरदार सरोवर बांधावर नर्मदा नदीची महाआरती करणार आहेत. गुजरात आणि मध्यप्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाच्या बांधाची उंची वाढविण्यासाठी मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठे योगदान दिले आहे. या धरणाची पातळी प्रथमच ऐतिहासिक उंची गाठणार आहे. त्यामुळे गुजराथेत ५ हजार ठिकाणी नर्मदा जल स्वागताचे कार्यक्रम केले जाणार आहेत.

भाजप अध्यक्ष जितूभाई वाघाणी यावेळी भाजपच्या राज्यातील प्रगती बद्दल माहिती देताना म्हणाले, गुजरात मध्ये भाजप सदस्यांची संख्या १ कोटींवर गेली असून प्रत्येक चार नागरिकांमागे १ नागरिक भाजप सदस्य आहे.

Leave a Comment