गुरूत्वाकर्षण विधानावर दिले भलतेच स्पष्टीकरण, पीयूष गोयल पुन्हा झाले ट्रोल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत बोलताना गुरूत्वाकर्षणाचा शोध अल्बर्ट आइन्स्टाइनने लावला असल्याचे विधान केले होते. यावरून गोयल यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

अर्थव्यवस्थेविषयी बोलताना गोयल यांनी विधान केले होते की, आइन्स्टाइनला गुरूत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी गणिताची काहीही मदत झाली नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था 5 हजार अब्ज डॉलर पर्यंत पोहचवण्याच्या लक्ष्याला गणिताच्या दृष्टीकोनातून बघितले जाऊ नये.

पीयूष गोयल यांच्या या विधानाने सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले.

 

https://twitter.com/karanku100/status/1172074005949403136

इंटरनेट युजर्सनी मीम्स बनवत त्यांची खिल्ली उडवली. फेसबूक आणि ट्विटर युजर्सनी त्यांना आठवण करून दिली की, गुरूत्वाकर्षणाचा शोध हा आइन्स्टाइनने नाही तर आयझॅक न्यूटनने लावला होता. आइन्स्टाइनने सापेक्षतेचा सिध्दांत शोधला होता.

https://twitter.com/abhijeet_dipke/status/1172109236890783744

एका कार्यक्रमात बोलत असताना गोयल यांनी गुरूत्वाकर्षणाच्या विधानावर स्पष्टीकरण दिले. मात्र येथेही त्यांनी गुरूत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही, असे विधान केले. ते म्हणाले की, मी अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याविषयी बोलत होता. मी केलेले विधान तोडून-मोडून शेअर केले जात आहे.

त्यामुळे पीयूष गोयल यांना ते ट्रोल कोणत्या कारणावरून होत आहेत, हेच समजले नसल्याचे दिसत आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील आता पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यांनी ट्विट केले की, जर असे मंत्री असतील, तर या देशाची अर्थव्यवस्था देवच वाचवू शकेल.

Leave a Comment