या दिवशी सर्वात प्रथम भारतात लाँच होणार वन प्लस कंपनीचा टिव्ही

वन प्लस कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. आता कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला पहिला स्मार्ट टिव्ही लाँच करणार आहे. भारत हा पहिला देश आहे जेथे कंपनी आपला स्मार्ट टिव्ही लाँच करणार आहे.

वन प्लसने अद्याप टिव्ही कधी लाँच होणार आहे याची तारीख जाहीर केलेली नाही. कंपनीने याआधी सांगितले होते की, स्मार्ट टिव्ही भारतात अँमेझॉनवर उपलब्ध असेल. अँमेझॉनच्या एका टिझरनुसार, वन प्लसचा स्मार्ट टिव्ही हा अँमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

अँमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलच्या मागेपुढेच हा सेल असण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टला सेल   27 सप्टेंबरला सुरू होणार आहे.

कंपनीने टिव्हीबद्दल काही माहिती स्पष्ट केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, वन प्लस टिव्ही 8 स्पीकर्सबरोबर येईल व यामध्ये Dolby Atmos असेल. याचबरोबर हा टिव्ही 55 इंच असून, QLED पॅनल, डॉल्बी विजन, 4K रिजोल्यूशन आणि स्लिम बेजल्सबरोबर हा टिव्ही येईल.

Leave a Comment