रियलमीचा 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच

रियलमीने आपला 64 मेगापिक्सल असणारा रियलमी एक्स टी हा फोन भारतात लाँच केला आहे. 64 मेगापिक्सल असणारा रियलमीचा हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचची सुपर एमोलेड स्क्रीन आहे. याचबरोबर फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच देखील देण्यात आला आहे. रियलमी एक्स टीमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 712 प्रोसेसर असून, यामध्ये 4000 एमएएचची बॅटरी देखील देण्यात आलेली आहे. याचबरोबर 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.

(Source)

हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 15,999 रूपये आहे. 6 जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत रूपये 16,999 रूपये आहे तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत रूपये 18,999  रूपये आहे. हा फोन दोन रंगामध्ये उपलब्ध असून, अँड्राइड 9 पायवर आधारित कलरओएस 6 वर चालेल.

(Source)

16 सप्टेंबरपासून प्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरू होणार आहे.

Leave a Comment