UNHRC मध्ये 47 देश असताना इम्रान खान यांनी मानले 58 देशांचे आभार, सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या सोशल मीडियावर हास्याचा विषय ठरत आहेत. याला कारणही तसेच खास आहे. इम्रान खान यांनी काश्मीरमुद्यावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगातील 58 देशांचे समर्थन असल्याचे म्हटले आहे. मात्र यामध्ये सदस्यांची संख्या केवळ 47 आहे. यामुळे पुन्हा एकदा इम्रान खान यांचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला चीन सोडून एकाही देशाचे समर्थन मिळालेले नाही. मात्र पाकिस्तान असे खोटे दावे करत स्वतःचेच हास्य करून घेत आहे.

जिनिव्हामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोग परिषदेत भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, पाकिस्तानने यामध्ये पडण्याची गरज नाही, असे भारताने म्हटले आहे.

यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट केले की, भारताने काश्मीरमध्ये बळाचा वापर थांबवावा, यासाठी 58 देशांनी मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याची मी प्रशंसा करतो.

https://twitter.com/ShiChikkalli/status/1172200845523292160

मात्र इम्रान खान यांनी हे ट्विट करताच त्यांचे खोटे समोर आले. ट्विटरवर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. अनेकांनी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगात 47 देश असल्याचे देखील सांगितले. अनेकांनी त्यांना गणित शिकवण्याचा देखील प्रयत्न केला.

Leave a Comment