टोलवर रोख रक्कम भरण्याऱ्यांकडून वसूल केला जाणार दुप्पट दंड

शुक्रवारी रात्री 12 नंतर दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर टँग असणे गरजेचे असणार आहे. रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन टॅग (आरएफआयडी) प्रणालीला कॅशलेस बनवण्यासाठी ईपीसीएने निर्देश दिले आहेत की, टॅगशिवाय टोलची रोख रक्कम भरणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट रक्कम घेतली जाईल. या निर्णयामुळे टॅगचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरएफआयडी प्रणाली अंतर्गत आतापर्यंत 3.6 लाखांपेक्षा अधिक टॅगची विक्री झाली आहे. मात्र रिचार्ज करणाऱ्यांची संख्या 4000-4200 च्या मध्ये आहे. वाहनांच्या मालकांना अप आणि वेबसाइटद्वारे देखील कागदपत्रे अपलोड करणाऱ्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यानंतर देखील टॅग रिजार्ज करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने टोलची रोख रक्कम भरणाऱ्यांकडून दुप्पट रक्कम घेण्यात येणार आहे.

13 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून आरएफआयडी प्रणाली पुर्णपणे कॅशलेस बनवण्यासाठी  टॅग न लावलेले वाहन आणि रिचार्ज न केलेल्या वाहनधारकांना दंड आकारला जाणार आहे. टॅग लावलेले असतानाही काही वाहनचालक रोक रक्कमेद्वारे टोल भरत आहेत. यामुळे टोलवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागतात, त्यामुळे दुसऱ्या वाहनधारकांना त्रास होतो. टोल प्लाजावर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम लागू करण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

 

Leave a Comment