कधी उन्हावर कधी लठ्ठपणावर, वाचा या चित्रविचित्र टॅक्सबद्दल - Majha Paper

कधी उन्हावर कधी लठ्ठपणावर, वाचा या चित्रविचित्र टॅक्सबद्दल

इनकम टॅक्स आपण सर्वच जण भरत असतो. मग तो घराचा, पाण्याचा असो अथवा अन्य कशाचा. मात्र तुम्ही कधी उन्हाचा टॅक्स अथवा स्वतःच्या सावलीचा टॅक्स भरलेले ऐकले आहे का ? नाही ना. मात्र हे सत्य आहे. अनेक देशात उन्हापासून ते स्वतःच्या सावलीचा देखील टॅक्स वसूल केला जातो.

(Source)

अमेरिकेच्या ऑर्कन्स राज्यात शरीरावर टॅटू गोंदवण्यासाठी 6 टक्के कर द्यावा लागतो. याच इटलीमधील वेनेटो शहरात कॉनेग्लियानो नावाचे एक ठिकाण आहे. तेथे हॉटेल, रेस्तरां आणि दुकानाच्या बोर्ड अथवा टेंटमुळे रस्त्यावर सावली पडते त्याचा एक वर्षांसाठी 100 डॉलर टॅक्स वसूल केला जातो.

(Source)

स्पेनच्या बॅलरिक द्वीपावर 2016 पासून सन टॅक्स म्हणजेच उन्हाचा टॅक्स आकारला जात आहे. कारण तेथे दरवर्षी 1 करोड पेक्षा अधिक पर्यटक येतात. यामुळे स्थानिक संसाधनांवर परिणाम होतो. तर अमेरिकेत 2010 पासून टेनिंग टॅक्स घेतला जात आहे. हा टॅक्स घेण्याचा उद्देश हा आहे की, यामुळे स्कीन कॅन्सर रोखण्यास मदत होईल.

(Source)

ओल्ड स्टफ मॅग्झिननुसार, हंगेरीमध्ये 2011 पासून डब्बाबंद अन्नावर टॅक्स वसूल केला जात आहे. या डब्बाबंद अन्नामध्ये मोठ्याप्रमाणात साखर आणि मीठ असते. अधिकृतरित्या या टॅक्सला पब्लिक हेल्थ प्रोडक्ट टॅक्स म्हटले जाते. याचबरोबर अमेरिकेच्या अलबामा येथे पत्त्यांचा बंडल खरेदी करताना टॅक्स आकारला जातो. अशाप्रकारे टॅक्स गोळा करणारे अलबामा एकमेव राज्य आहे.

(Source)

न्युयॉर्क टाइम्सनुसार, जापानमध्ये मेटाबो कायद्यानुसार, 40 ते 75 वर्षांच्या नागरिकांची कंबर दरवर्षी मोजावी लागते. जर पुरूषांच्या कंबरे लांबी 85 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि महिलांची 90 सेंटीमीटर पेक्षा अधिक आहे, अशांना टॅक्स द्यावा लागतो.

 

Leave a Comment