भारताचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी – आयएमएफ

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) ने भारताची आर्थिक वृध्दी ही अपेक्षा पेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. कॉर्पोरेट आणि पर्यावरण नियमांमधील अनिश्चितता आणि काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा कमकुवतपणा याला कारणेभूत असल्याचे म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हे देखील म्हटले आहे की, यानंतर देखील भारत चीनपेक्षा अधिक पुढे आणि जगातील सर्वात तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था असेल.

आयएमएफचे प्रवक्ता गेरी रायस एका संमेलनात म्हणाले की, आम्ही नवीन आकडे लवकरच सादर करू. मात्र . कॉर्पोरेट आणि पर्यावरण नियमांमधील अनिश्चितता आणि काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा कमकुवतपणा यामुळे भारताची सध्याची आर्थिक वृध्दी अपेक्षापेक्षा कमी आहे.

एप्रिल ते जूनच्या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर 5 टक्के असून, हा मागील सात वर्षातील सर्वात कमी दर आहे. मागील वर्षी विकास दर 8 टक्के होता. आयएमएफने 2019-20 साठी भारताचा आर्थिक विकास दर हा 0.3 टक्क्यांनी कमी केला आहे. याचे कारण घरगुती मागणीत आलेली घट सांगण्यात येत आहे. आयएमफच्या रिपोर्टमध्ये आर्थिक वर्ष 2021 साठी विकास दर 7.5 असेल अशी अपेक्षा होती. मात्र हा दर 7.2 टक्के आहे.

भारत सरकारच्या आकड्यांनुसार, मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी क्षेत्रामधील मंदीमुळे आर्थिक विकास दर घटला आहे. 2012-2013 मध्ये देखील भारताचा विकास दर हा 4.9 टक्के होता.

Leave a Comment