पाकने दहशतवाद्यांवर केले 7 लाख कोटी खर्च, इम्रान खान यांचा कबूलनामा

पाकिस्तानने दहशतवाद्यांना संरक्षण दिल्याचे पुन्हा एकदा मान्य केले आहे. पाकिस्तानने मान्य केले आहे की, दहशतवादी संघटना मुजाहिद्दीनला प्रशिक्षण तर दिलेच त्याबरोबर अर्थव्यवस्थेचे 100 बिलियन डॉलर म्हणजेच 7 लाख करोड रूपये देखील त्यांच्यावर खर्च केले आहेत.

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील दहशतवाद्यांना जागा दिल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यांचे म्हणणे आहे की, सोव्हियतच्या विरोधात लढण्यासाठी जिहाद केले होते. यासाठी अमेरिकेच्या सीआयएने फंड दिला होता.

इम्रान खान म्हणाले की, हा खूप मोठा विरोधाभास आहे. पाकिस्तानला तटस्थ राहणे गरजेचे होते. मात्र यामुळे हे सर्व संघटन पाकिस्तानच्या विरूध्द झाले. आम्ही 70 हजार लोकांना गमवले आहे. आम्ही त्यांच्यावर अर्थव्यवस्थेतील 7 लाख करोड रूपये खर्च केले. शेवटी अमेरिकेने आमच्यावर अफगाणिस्तानमध्ये अपयशी झाल्याचा आरोप केला.

याआधी पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाहने देखील मान्य केले होते की, पाकिस्तानने दहशतवादी संघटना जमात –उद-दावावर करोडो रूपये खर्च केले आहेत. ही संघटना पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच अफगाणिस्तानमध्ये लढत होती.

Leave a Comment