आमचा सरकारवरून पुर्णपणे विश्वास उडाला – मद्रास हायकोर्ट

चेन्नईमध्ये एक बेकायदेशीर होर्डिंगने 23 वर्षीय युवतीचा जीव घेतला आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या 23 वर्षीय सुबाश्री ऑफिसवरून घरी जात असताना, रस्त्यावर असलेला एमआयएमडीएमके पक्षाचे बेकायदेशीर होर्डिंग तरूणीच्या वरती पडले. होर्डिंग अंगावर पडल्याने खाली पडलेल्या तरूणीच्या अंगावरून भरधाव वेगाने ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. यामध्ये तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणावरून मद्रास हायकोर्टाने सरकारला चांगलेच फटकारले आहे. मद्रास हायकोर्टाने अनेकदा बेकायदेशीर होर्डिंग न लावण्याविषयी आदेश दिले आहेत. मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश शेषाय म्हणाले की, या देशात लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही. ही नोकरशाहांची उदासीनता आहे. माफ करा. आम्ही सरकारवरील विश्वास गमवला आहे.

या प्रकरणावरून डीएमकेचे प्रमुख एम.के स्टॅलिन यांनी सरकारवर टीका केली आहे. स्टॅलिन म्हणाले की, सरकार आणि पोलिस आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे सुबाश्रीचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीर होर्डिंगमुळे याआधी प्राण गेले आहेत. सत्तेचे भूखे असणाऱ्या या सरकारच्या काळात आणखी किती जणांचे प्राण जाणार आहेत ?

हे होर्डिंग एआयएडीएमकेच्या माजी काउन्सिलरच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमासंबंधी लावण्यात आले होते. 2017 साली देखील मद्रास हायकोर्टाने बेकायदेशीर होर्डिंग लावण्यास बंदी घातली होती.

Leave a Comment