बिझनेस ट्रिपवर सेक्स करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू, न्यायालयाने कंपनीला धरले जबाबदार

फ्रांसमध्ये बिझनेस टूरसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा सेक्स करत असताना अचानक झाल्याने पॅरिसच्या न्यायालयाने या घटनेसाठी कंपनीला जबाबदार धरले आहे. झेव्हियर एक्स नावाच्या व्यक्तीला रेल्वे सेवा कंपनीने 2013 मध्ये सेंट्रल फ्रांस लॉरिट येथील एका हॉटेलमध्ये बिझनेस मिटिंगसाठी पाठवले होते. मात्र तेथे एका महिलेबरोबर सेक्स करत असताना त्याला कार्डियक अरेस्ट आला व त्याचा मृत्यू झाला. 6 वर्षांपर्यंत चाललेल्या या केसमध्ये न्यायायलयाने आता आपला निर्णय दिला आहे.

फ्रांसच्या हेल्थ इंश्योरेंस कंपनी Caisse Primaire d’Assurance Maladie (CPAM) ने देखील या घटनेला वर्कप्लेस दुर्घटना म्हटले आहे. झेव्हियरच्या कुटुंबाने या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली होती.

कंपनीने न्यायालयात म्हटले होते की, शरीरिक संबंध ठेवणे हा कामाचा भाग नाही. याचबरोबर त्या व्यक्तीचा मृत्यू हा दुसऱ्या हॉटेलमध्ये झाला आहे. त्यामुळे तो बिझनेस ट्रिपवर नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे कंपनीने म्हटले होते.

मात्र न्यायालयाने आपला निर्णय देत कंपनीला मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने म्हटले की, शारिरिक संबंध हे रोज दैनंदिन गोष्टी अंघोळ करणे, जेवण करणे यासारखेच आहे.

Leave a Comment