होंडाच्या कारवर मिळत आहेत 4 लाखांपर्यंत सूट

फेस्टिव सीजनची लवकरच सुरूवात होणार आहे. अनेक कार कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर्स देण्यात येत आहेत. आता होंडा कंपनी कारवर 4 लाखांपर्यंतची सुट देणार आहे. याचबरोबर जुन्या कारच्या एक्सचेंजवर अतिरिक्त सुट मिळणार आहे. कंपनीची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

(Source)

होंडा अमेझ –

होंडाच्या या कारवर 42 हजार रूपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन कार खरेदी केल्यावर 12 हजार रूपयांची एक्सटेंडेट वॉरंटी देखील मिळेल. याचबरोबर 16 हजार रूपयांचा 3 वर्षांसाठी होंडा केअर मेंटनेंस प्रोग्राम देखील मिळेल. तर जुन्या कारच्या एक्सचेंजवर चौथ्या आणि पाचव्या वर्षाची 12 हजार रूपयांपर्यंत एक्सटेंडेंट वॉरंटी देखील मिळेल. याचबरोबर 30 हजार रूपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे. मात्र एसीई एडिशनवर ही ऑफर लागू नाही.

(Source)

होंजा जॅझ –

या कारवर 25 हजार रूपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट आहे. तर जुन्या कारवर अटींनुसार, 25 हजार रूपयांपर्यंतची सूट आहे.

(Source)

होंडी डब्ल्यूआर-व्ही –

होंडाच्या या कारवर 25 हजार रूपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरवर 20 हजार रूपये अतिरिक्त सूट मिळत आहे.

(Source)

होंडा सिटी –

या कारवर 30 हजार रूपये सूट मिळत असून, एक्सचेंज ऑफरमध्ये 32 हजार रूपये सूट आहे.

(Source)

होंडा बीआर-व्ही –

या कारवर तुम्हाला 1.10 लाख रूपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. जुन्या कारच्या एक्सचेंजवर नवीन बीआर-व्ही खरेदी केल्यावर 33,500 रूपयांपर्यंतचे कॅश डिस्काउंट, 50 हजार रूपयांचे अतिरिक्त डिस्काउंट आणि 26 हजार रूपयांची एक्सेसरीज देण्यात येत आहे.

(Source)

होंडी सिविक –

या कारवर काही अटींबरोबर 2 लाख 50 हजार रूपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

(Source)

 

होंडा सीआर-व्ही –

या कारवर तुम्हाला तब्बल 4 लाख रूपयांपर्यंत सूट मिळू शकते. होंडाचे हे सर्व ऑफर्स लोकेशन आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळे आहेत.

अधिक माहितीसाठी https://www.hondacarindia.com/offers या लिंकला भेट द्या.

 

Leave a Comment