अनेक देशात कडक आहेत वाहतूक नियम


भारतात रस्ते अपघातात होणारे मृत्यू प्रमाण कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून १ सप्टेंबर पासून नवे वाहतूक नियम लागू केले गेले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदस्त दंड ठोठावला जात आहे. त्यावर सर्व राज्ये आणि राजकीय पक्ष दंड कमी करावे अशी मागणी करत आहेत आणि अनेक राज्यांनी हे नवे नियम लागूच केलेले नाहीत. पण जगात असा भरभक्कम दंड आकारणारे आपण एकटे राष्ट्र नाही. भारतापेक्षा कमी विकसित आणि गरीब देशातही वाहतूक नियम कडक असून ते सक्तीने अमलात आणले जातात. अश्याच काही देशाची माहिती आमच्या वाचकांसाठी.


महासत्ता अमेरिकेत वहातूक नियम अतिशय कडक पाळले जातात. येथे रस्ता मोकळा असला आणि लाल सिग्नल असला तरी सिग्नल तोडून जाता येत नाही. येथे सीटबेल्ट शिवाय गाडी चालविली तर २५ डॉलर्स, परवाना नसताना गाडी चालविली तर १ हजार डॉलर्स, विदाउट हेल्मेट ३०० डॉलर्स तर नशेत गाडी चालविली तर चालकाचा परवाना ३ महिन्यासाठी रद्द केला जातो शिवाय दंड भरावा लागतो. फोनवर बोलताना गाडी चालविल्यास १० हजार दंड होतो.


सिंगापूरमध्ये विना परवाना गाडी हाकली तर ३ लाख रुपये, नशेत गाडी चालविल्यास ३.५९ लाख रुपये शिवाय ३ महिने तुरुंगवास, फोनवर बोलताना गाडी चालविल्यास ७२ हजार रुपये आणि सहा महिने तुरुंगवास अशी शिक्षा आहे. भारतापेक्षा छोटा आणि गरीब तैवान मध्ये नशेत गाडी चालविल्यास ४ लाख रुपये दंड आकाराला जातो. ओमान सारख्या छोट्या देशात फोनवर बोलताना गाडी चालविली तर ५० हजार रुपये दंड आकाराला जातो.


हॉलंडमध्ये ओव्हरस्पीड अथवा रस्त्यावर रेस केल्यास, जागोजागी घालून दिलेल्या ठराविक वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास गाडी कायमची जप्त केली जाते. विशेष म्हणजे या देशात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून कोणतेही कारण न ऐकता दंड वसुली केली जाते. त्यासाठी अनेकांना कर्ज घावे लागते तर काही त्यासाठी क्रेडीट कार्डचा वापर करतात असे समजते.

Leave a Comment