विराटने शेअर केलेल्या फोटोमुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण

सध्या सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेमागे कारण ठरले आहे, ते म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीने शेअर केलेला फोटो.

विराट कोहलीने एका सामन्यातील धोनीबरोबरच फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना विराटने लिहिले की, मी हा सामना कधीच विसरू शकत नाही. स्पेशल रात्र. या व्यक्तीने मला फिटनेस टेस्ट सारखे पळवले.

या फोटोमध्ये विराट कोहली धोनीसमोर नतमस्तक झाल्यासारखे दिसत आहे. यावरूनच सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा रंगू लागली आहे. धोनीकडून अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

विराट कोहलीने शेअर केलेला फोटो हा 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील आहे. ऑस्ट्रेलिया झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या सामन्यात धोनी आणि विराटने 67 धावांची महत्त्वपुर्ण भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

विराटने शेअर केलेल्या या फोटोनंतर धोनीचे चाहते केवळ एकच प्रश्न विचारत आहेत की, धोनी निवृत्त होणार आहे का ? निवृत्ती बाबत मात्र धोनीकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

 

Leave a Comment