या कंपनीच्या सांभर मसाल्यात आढळला धोकादायक बॅक्टेरिया

गेली अनेक वर्षांपासून जेवणातील स्वाद वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एमडीएच मसाल्याबद्दल मोठा खुलासा झाला आहे. या मसालामध्ये ‘सालमोनेला’ नावाचा बॅक्टेरिया आढळून आला आहे.अमेरिकेच्या फूड अँन्ड ड्र एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून एमडीएच ब्रांडच्या सांभर मसाल्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया सापडल्यानंतर कंपनीने मसाल्याचे तीन लॉट अमेरिकेतून परत मागवले आहेत. एफडीएद्वारे करण्यात आलेल्या चाचणी परिक्षणामध्ये मसाल्यात साल्मोनेला बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले आहे.

नॉर्थ कॅरिलोना येथील रिटेल स्टोर्समध्ये विक्री करण्यात येत असलेले मसाले कंपनीने परत मागवले आहेत.

साल्मोनेलाबॅक्टेरियामुळे साल्मोनेलोसिस नावाचा आजार होतो. यामुळे अतिसार, पोटदुखी आणि ताप यासारख्या गोष्टी होतात. यातून बरे होण्यासाठी देखील 4 ते 7 दिवस लागतात. वृध्द, बालक आणि कमकुवत  इम्यून सिस्टम असणाऱ्या लोकांना या आजारांचा जास्त धोका असतो.

Leave a Comment