राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाळ बुधवारी दिल्ली येथे मुगल बादशाह शाहजहांचे पुत्र आणि विचारक दारा शिकोहवर आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मी विश्वासाने सांगू शकतो की, दारा शिकोहने जर भारतावर राज्य केले असते तर इस्लामचा देशात अधिक प्रसार झाला असता आणि हिंदू देखील इस्लामला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकले असते.
देशावर 600 वर्ष शासन करणारा मुस्लिम समाज भयभीत का ?, आरएसएस नेता
कृष्ण गोपाळ म्हणाले की, हजार आणि लाखभर लोकसंख्या असणारे इतर धर्मातील लोक भयभीत नसताना, देशावर 600 वर्ष राज्य करणारे आणि 16-17 करोड लोकसंख्या असणारा मुस्लिम समाज भयभीत का आहे ?
ते म्हणाले की, जर कोणतीही भिती असेल तर ती दूर करण्यासाठी चर्चा करण्याची गरज आहे. भारतात कोणाचीही इच्छा नसेल की, पाकिस्तानातील लोक दुःखी राहावीत. कारण भारताची परंपरा सर्वे भवंतु सुखिनः अशी आहे.
त्यांनी एका लेखाचा संदर्भ देत सांगितले की, या देशात जवळपास 50 हजार पार्शी, 45 लाख जैन, 80-90 लाख बौध्द ख्रिश्चन 5 हजार आहेत. हे लोक भयभीत नाहीत. तुम्ही कधी ऐकले आहे का पार्शी भयभीत आहे, जैन भयभीत आहे, मात्र 16-17 करोड लोकसंख्या असणारा समाज भयभीत का आहे ? हा मोठा प्रश्न आहे.
ते म्हणाले की, भारताचा विचार हा विभाजनवादी नाही. भारत सर्वे भवंतु सुखिन: अशी परंपरा मानणारा देश आहे.