अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सरकार एवढे कनफ्यूज का आहे ? – प्रियंका गांधी

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ऑटो सेक्टरमधील मंदीचे कारण लोक नवीन गाड्या खरेदी करण्याऐवजी ओला-उबेरचा वापर करणे हे आहे असे विधान केले होते. निर्मला सितारमण यांच्या या वक्तव्यावर काँग्रेच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, निवडणुकीच्या आधी सांगण्यात आले की, ओला-उबेरने रोजगार वाढवला आणि आता सांगण्यात येत आहे की, ओला-उबेरमुळे ऑटो सेक्टरमध्ये मंदी आली आहे. भाजपची सरकार अर्थव्यवस्थेबाबत एवढी कनफ्यूज का आहे ?

याआधी देखील प्रियंका गांधी यांनी अर्थव्यवस्थेवर मोदी सरकारवर निशाना साधला आहे. प्रियंका गांधींनी ट्विट केले होते की, अर्थव्यवस्थेची वाट लावून, सरकार शांत बसले आहे. सरकार नाटक करून, खोट बोलून प्रचार करत आहे.

सध्या ऑटो सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंडई, महिंद्रा अँन्ड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि होंडा यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये घसरण आली आहे.

Leave a Comment