इम्रान खान यांची होऊ शकते हकालपट्टी!

पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पाकचे सैन्य इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटवून दुसऱ्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक करू शकते. एका टिव्ही चॅनेलवर पाकिस्तानच्या नेत्याने म्हटले आहे की, 27 ऑक्टोंबरपर्यंत इम्रान खान पदावर राहतील नंतर त्यांना हटवले जाईल. तसेच, नवीन पंतप्रधानाची नेमणूक केल्यानंतर पाकिस्तान भारताबरोबर युध्द करण्याची योजना आखण्याची शक्यता आहे.

इम्रान खानला अंतर्गत विरोध –

पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांची निवड ही सैन्याच्या इच्छेने होते असते. या निवड झालेल्या पंतप्रधानाला सैन्याचे इशाऱ्यावरच काम करावे लागते. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून इम्रान खान आणि पाक सैन्य भारतावर जोरदार टीका करत आहे. इम्रान खान यांचा पाकिस्तानचे इतर नेते देखील विरोध करतात. इम्रान खान यांनी संसदेमध्ये त्यांचे पुर्ण नाव इम्रान खान नियाजी सांगितले होते. तेथील खासदार देखील इम्रान खान यांना बाहेरचे समजतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने त्यांच्यावर राज्य करावे हे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांना आवडणे शक्यच नाही.

अणूबॉम्बची धमकी –

पाकिस्तानी सैन्याच्या सांगण्यावरून इम्रान खानने भारताला अणूबॉम्बची धमकी देखील दिली. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. आंतरराष्ट्रीय समुहात पाकिस्तानला समर्थन मिळत नाहीये.

पाकमधील नागरिक महागाईला वैतागले  –

इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीनच ढासळली आहे. पाकमध्ये महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाज्यांचे भाव देखील आकाशाला टेकले आहेत. टॉमेटो आणि कांदा या सारख्या दैनदिन वापरातील वस्तू देखील 200 ते 300 रूपये प्रती किलो झाल्या आहेत.

कलम 370 वरून पाकिस्तानला कोणाचेचे समर्थन नाही –

भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चिडला आहे. मात्र पाकिस्तानला या मुद्यावरून एका देशाने समर्थन दिलेले नाही. संयुक्त राष्ट्रामध्ये देखील पाकिस्तानला या मुद्यावर समर्थन मिळालेले नाही.

पाकिस्तानमध्ये बलूच आणि पश्तून नेते विरोधात –

पाकिस्तानमधील बलूच आणि पश्तून नेते पाक सरकारचा जोरदार विरोध करत आहेत. हे नेते रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करत आहेत. हे नेते पाकिस्तानपासून स्वातंत्र्य होण्याची मागणी करत आहेत.

मदन न मिळाल्याने सैन्य निराश –

काश्मीर मुद्यावर कोणत्याही देशाचे पाकला समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानचे नेते आणि सैन्य अधिकारी चिंतेत आहेत. भारताविरोधात त्यांना एकही कारवाई करता येत नाहीये.

अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली  –

इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर पाकची अर्थव्यवस्था आणखीनच डबघाईला आली आहे. एका पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार नवाज शरीफ यांच्या कार्यकाळापेक्षा इम्रान खानच्या सरकारने केवळ एकावर्षात दोन तृतीयांश अधिक कर्ज घेतले आहे.

देशांतर्गत व परराष्ट्र धोरण  –

परराष्ट्र धोरणात पाकिस्तान सरकार चीन आणि अमेरिकेबरोबर योग्य संबंध बनवण्यास अपयशी ठरले आहे. अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सउदी अरब आणि युएई देखील पाकिस्तान सरकार गुंतवणुकीसाठी तयार करू शकलेला नाही.

Leave a Comment