या भाविकांनी गणरायाला हेल्मेट परिधानकरून निरोप दिला

देशात वाहतुकीचे नियम बदलल्याने दंडाची रक्कम भरण्यावरून नागरिकांमध्ये भिती दिसून येत आहे. गुजरातच्या सुरतमध्ये देखील असेच चित्र पाहायला मिळाले. सुरत येतील गणपतीच्या मंदिरात लोक हेल्मेट घालून आरती करताना दिसले.

सुरतच्या वेसू भागात नंदनी-1 येथे गणपतीच्या विसर्जनासाठी आरतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आरतीमध्ये सहभागी होणारे भक्त हेल्मेट परिधान करूनच आरती करायला आले. बाप्पाची आरती करण्यासाठी आलेल्या कुसुम कोठारी म्हणाल्या की, त्या हेल्मेट परिधानकरून आरती करत लोकांना संदेश देऊ इच्छितात की, हेल्मेट परिधान केले पाहिजे. त्या म्हणाल्या की, सरकारने जे नियम केले आहेत ते सुरक्षेसाठीच केले आहेत.

(Source)

लोकांच्या मनात दंडाची रक्कम भरण्याविषयी असल्याने हेल्मेट परिधान करून आल्याची देखील चर्चा रंगली आहे.

 

Leave a Comment