कारागृहातील कैदी आता फोनद्वारे साधू शकतील नातेवाईकांशी संवाद

जम्मू-काश्मीरचे कारागृह पोलिस महासंचालक वी. के सिंह यांनी बुधवारी सांगितले की, कैद्यांना लवकरच ‘कैदी कॉलिंग ‘सुविधा देण्यात येणार आहे. या सेवेद्वारे ते नातेवाईक आणि वकिलांशी फोनद्वारे बोलू शकणार आहेत. जम्मूमधील कारागृहात आधिकाऱ्यांच्या एका संमेलनात संबोधित करताना वी. के सिंह यांनी याबाबत माहिती दिले. मात्र गंभीर गुन्ह्यांचा आरोप असणाऱ्या कैद्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही.

त्यांनी सांगितले की, कैदी कॉलिंग सुविधा केंद्र हे श्रीनगर, कोटभलवाल जम्मू याचबरोबर स्थानिक जिल्हा कारगृहात देखील सुरू केली जाईल. यामध्ये कैदी ठराविक दिवशी दोन जवळच्या नातेवाईकांशी पाच मिनिटे संवाद साधू शकतील.

ते म्हणाले की, विभाग जिल्ह्यामध्ये कॅबिन आणि चाइल्ड फ्रेंडली कॉर्नर बनवून भेटीसाठी असणाऱ्या जागेमध्ये सुधारणा करत आहे. याचबरोबर कारागृहातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कल्याण आणि त्यांच्या विकासावर देखील लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे.

Leave a Comment