पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचे सरकार अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले आहे. ब्रिगेडियर एजाज अहमद शाह हे इस्लामबाद येथे म्हणाले की, काश्मीर मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समूहात समर्थन मिळवण्यास अपयशी ठरले आहे. याचबरोबर देशाची प्रतिमा खराब करण्यास पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचे देखील म्हटले आहे.
धक्कादायक कबुली, काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय समूहाने पाकला लाथडले
एजाज एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखती म्हटले की, आंतरराष्ट्रीय समूहाला आमच्यावर विश्वास नाही. काश्मीर मुद्यावर आंतरराष्ट्रीय समूह आमच्यावर विश्वास ठेवत नाहीये. मात्र आंतरराष्ट्रीय समूह भारतावर विश्वास ठेवत आहे. लोक पाकिस्तानला गंभीरतेने घेत नाहीत. एजाज यांनी माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, परवेज मुशर्रफ यांना देशाची प्रतिमा खराब करण्यासाठी जबाबदार धरले आहे.