अफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलची निवड, केएल राहुलला डच्चू

दक्षिण अफ्रिकेविरूध्द खेळल्या जाणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये सलामीवीर केएल राहुलला डच्चू देण्यात आलेला आहे. वेस्ट इंडिज विरूध्द झालेल्या मालिकेत केएल राहुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. राहुलने 4 डावांमध्ये 25.25 च्या सरासरीने केवळ 101 धावा केल्या होत्या.

राहुलला वगळण्यात आल्याने रोहित शर्माला सलामीला येण्याची शक्यता आहे. याचबरोबर केएल राहुलच्या जागी युवा खेळाडू शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे.

20 वर्षीय शुभमन गिलने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर भारतीय अ संघाकडून खेळाताना शानदार कामगिरी केली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा शुभमन गिल सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. याचबरोबर हुनामा विहारी आणि मयंक अग्रवाल यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि शुभमन गिल

 

Leave a Comment