या आहेत भविष्यातील सुपर हाय-टेक कार्स

सध्या जर्मनीमध्ये 2019 Frankfurt Motor Show सुरू आहे. हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो शो पैकी एक शो आहे. या शोमध्ये शेकडो कंपन्यांनी भाग घेतला असून, भविष्यातील अनेक हाय-टेक कार येथे सादर केल्या जात आहेत. फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये काही खास कॉन्सेप्ट कार सादर करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

(Source)

या मोटर शो मध्ये ह्युंडईची 45 ईव्ही कॉन्सेप्ट कार सादर करण्यात आली. 45 वर्षापुर्वी लाँच करण्यात आलेल्या पोनी कूप या कारवरून नाव कंपनीने या कारचे नाव ठेवले आहे. या कारमध्ये मागील व पुढील बाजूला 45 अँगल डिग्रीमध्ये हिरे लावण्यात आलेले आहेत.

(Source)

जर्मनीची लग्जरी कार कंपनी ऑडीने या कार शोमध्ये AI TRAIL इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार सादर केली. ही सेल्फ ड्राइव्ह कार आहे. कारचे डिझाइन आणि याचे हायटेक फिचर्स तुम्हाला नक्कीच आवडतील. कारचा मोठा भाग हा ग्लासपासून बनवलेला असून, यामध्ये मोठमोठे व्हील्स देण्यात आलेले आहेत.

‘(Source)

बीएमडब्ल्यूने सीरिज 4 मधील कॉन्सेप्ट कार या शोमध्ये सादर केली. या कारद्वारे हे स्पष्ट होते की, कंपनी डिझाइनमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. या कारचे फायनल प्रोडक्शन मॉडेल कधीपर्यंत लाँच होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

(Source)

सेट कंपनीने कुप्रा (Cupra) नाव असलेली कार फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये सादर केली. ही एक हायटेक कार आहे. मात्र कॉन्सेप्ट मॉडेल हे प्रोडक्शन मॉडेलपेक्षा मोठ्या प्रमाणात वेगळे असते.

(Source)

मर्सेडिज बेंजने फ्रँकफर्ट मोटर शोमध्ये व्हिजन ईक्यूएस हे मॉडेल सादर केले. या मॉडेलमध्ये 940 एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत. यामधील इंटेरियर अल्ट्रा मॉर्डन सलून टाइप आहे. ही एक इलेक्ट्रिक्ल कार असून, यामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत.

Leave a Comment