हे आहे विटांनी बांधलेले सर्वात प्राचीन मंदिर


भारताच्या कानाकोपऱ्यात निसर्गाने सौंदर्याची उधळण केली आहे. निसर्गाबरोबरच माणसानेही अनेक सुंदर कलाकृती, बांधकामे करून या देशाला आणखी सुंदर बनविले आहे. आजकाल पर्यटनाचे स्वरूप बदलले असून सुटी मिळताच ट्रेकिंगसाठी जाण्यास अनेकजण पसंती देत आहेत तर काही पर्यटक देशाचा संपन्न वारसा जपणाऱ्या ठिकाणांना भेटी देत आहेत. त्यातील एका आहे छत्तीसगढ हे राज्य. दाट जंगले, उंच पहाड आणि नक्षलवाद्यांची दहशत असूनही पर्यटक या राज्याला भेट देण्यास पसंती दर्शवित आहेत. या राज्यातील हेरिटेज साईट, पर्यटक तसेच पुरातत्त्वशास्त्र तज्ञांचे आवडते ठिकाण बनत असल्याचे दिसून येत आहे.

या राज्यातील सिरपूर हे ठिकाण त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येतील. रायपूरपासून ८४ किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी देशातील पहिले विटानी बांधकाम केलेले सर्वात प्राचीन मंदिर आहे. त्याला लक्ष्मण मंदिर असे नाव असून हे मंदिर ५ ते ८ या शतकात सोमवंशीय राजा बालार्जुन याच्या आईने पती हर्षगुप्त याची आठवण म्हणून बांधले असे इतिहास सांगतो. लाल विटांमध्ये हे मंदिर बांधले गेले असून ते वास्तविक विष्णूला समर्पित आहे. पण गाभाऱ्यात शेषनागावर लक्ष्मणाची मूर्ती आहे. त्यामुळे या मंदिराला लक्ष्मण मंदिर असे नाव पडले आहे. हे मंदिर महानदीच्या काठी बांधले गेले आहे.

Leave a Comment