साक्षी धोनीचा ग्लॅमरस लुक व्हायरल


भारतात किंबहुना क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या सर्व देशात क्रिकेटपटू आणि त्यांची कुटुंबे या विषयी नेहमीच चाहते काही ना काही ऐकायला उत्सुक असतात. टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही सध्या सोशल मिडीया स्टार बनला आहेच पण त्याची पत्नी साक्षी हिनेही सोशल मिडियावर चांगलीच लोकप्रियता मिळविली आहे. साक्षी सध्या इटलीच्या रोम मध्ये सुटी एन्जॉय करत असून तिने तिचे मैत्रिणींसोबतचे काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये साक्षीचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून येत आहे. हे फोटो इटलीच्या लेक कोमो येथील आहेत, स्टायलिश ड्रेसेस आणि त्याला शोभतील अश्या एक्सेसरिज मध्ये साक्षी एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीप्रमाणे दिसते आहे. विशेष म्हणजे तिचा मेकअप विशेष चर्चेचा ठरला आहे. कारण तिने अगदी हलका मेकअप केला असून डोळ्यावर फंकी आयग्लासेस दिसत आहेत.

या फोटोत कुठेही कन्या जीवा आणि माही दिसत नाहीत. साक्षीने ती अगदी जिवलग मैत्रिणींसोबत सुटीवर आल्याचे स्पष्ट केले आहे. माही इंग्लंड वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारतीय लष्करी जवानांबरोबर १५ दिवस काश्मीर भागात ड्युटी बजावली होती. मध्यंतरी त्याचे गोल्फ खेळतानाचे अमेरिकेत काढलेले फोटो आले होते. धोनी अजूनही भारताबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment